मातोश्री हॉस्पिटल | लॅपरोस्कोपी |
भारतासारख्या प्रगतीशील देशामध्येही लग्न करायचं वय वाढू लागलं आहे. पूर्वी मुली १८ वर्षांच्या झाल्या की, घरामध्ये लग्नाची चर्चा सुरू व्हायची. आजची परिस्थिती फार वेगळी आहे. बहुतांश पालक आपल्या मुलांचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत आणि पुढे नोकरी लागेपर्यंत लग्नासाठी थांबतात. त्यामुळे वयाच्या २८-२९ वर्षी लग्न झालेल्या मुली तिशीत गरोदरपणासाठी तयार होतात.
बदलत्या जीवनशैलीचा आपल्या शरीरावर मुख्यत्वे करून संप्रेरकांवर परिणाम होतो. पाळीची अनियमितता, पीसीओएस (PCOS) सारख्या समस्या कमी वयात येऊ लागल्या आहेत. पाळी अनियमित असेल तर अशा बीजांडामध्ये अंडी तयार होत नाहीत आणि जर तयार झाली तर ती बीजांडाच्या बाहेर पडत नाही. अशा वेळेस गर्भधारणा राहण्यास मज्जाव होतो.
वंध्यत्व याची व्याख्या अशा प्रकारे, ज्यांच्या लग्नाला एक वर्ष झालं आहे, त्यांचा नियमितपणे शारीरिक संबंध होतो आणि जे गर्भधारणा न होण्यासाठी काहीही साधनं वापरत नाहीत, तरीही त्यांना गर्भधारणा न होणे अशा जोडप्यांना वंध्यत्व असलेली जोडपी आहे असं म्हटलं जातं.
मूल न होण्याची वेगवेगळी कारणं आहेत. त्यापैकी काही खालीलप्रमाणे-
स्त्री :
- बीजांडात बीज तयार न होणं.
- बीजांडातून बीज न सुटणं.
- गर्भनलिका बंद असणं.
- गर्भपिशवीतील आतील आवरण कमी जाडीचं असणं.
- गर्भपिशवीत गाठ, पडदा असणं.
- गर्भपिशवीत गाठ, पडदा असणं.
- गर्भपिशवीत जन्मजात दोष असणं.
पुरुष :
- शुक्राणूची संख्या कमी असणं.
- शरीरसंबंधामध्ये अडचणी असणं.
- बीजांडांमधील दोष याचं प्रमाण अशा जोडप्यांमध्ये जास्त दिसतं. Endometriosis नावाचा आजार हा मुख्यत्वे करून दिसण्यात येतो. Endometriosis म्हणजे काय ते आपण पाहू.
पाळी येते तेव्हा रक्त आणि गर्भपिशवीतल्या आतलं आवरण जसं योनीमार्गातून बाहेर येतं तसं काही स्त्रियांमध्ये स्राव जास्त असल्यास गर्भनलिकेतून पोटात रक्त पडतं. असं हे रक्त आणि गर्भाशयाच्या आतील आवरणाच्या पेशी या पोटाच्या आतल्या अवयवांवर जाऊन चिकटतात. मुख्यत्वे करून अशा बीजांडामध्ये रक्ताच्या सिस्ट (cyst) होतात. ज्याला चॉकलेट सिस्ट (cyst) असंही म्हटलं जातं. अशा स्त्रियांना पोटात दुखण्याचा त्रास होतो आणि गर्भधारणा राहण्यास अडथळे येतात.
- पाळीच्या बाराव्या दिवसानंतर रोज किंवा एक दिवस सोडून शरीरसंबंध असावा. संबंध झाल्यावर लगेचच स्त्रीने उठू नये, १०-१५ मिनिटे झोपून राहावं. बऱ्याच जोडप्यांचा प्रश्न असतो की, शरीरसंबंध झाल्यानंतर योनीमार्गातून पाणी बाहेर येतं, जे सामान्य आहे. शुक्राणू हे Seminal Fluidमध्ये असतात. शुक्राणूंना त्यांची स्वतःची गती असते. ते गर्भाशयाच्या मुखातून गर्भपिशवीत प्रवेश करतात आणि गर्भनलिकेपर्यंत स्वतः प्रवास करतात. Seminal Fluidचा उपयोग फक्त शुक्राणूंना गर्भमुखापर्यंत नेण्यापुरताच असतो. त्यामुळे हे Seminal Fluid योनीमार्गातून बाहेर येणं स्वाभाविक आहे.